
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
मागील आठवड्यापासून उन्हाच्या चटक्याची चाहूल हळूहळू जाणवत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती उन्हाच्या लखलखत्या लाही पासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असताना भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी थेथील यंत्रणेला उन्हामध्ये ग्राहक राजा तपत असताना या बाबीचे काही सोयर सुतक दिसत नाही बँकेच्या दर्शनी भागाला कोणत्याही प्रकारची व्यवस्था ग्राहकाला क्षणभर विश्रांती होईल अशी व्यवस्था करण्याचे गरजेचे असताना येथे मात्र दुर्लक्षित पनाचे धोरण अवलंबत असल्याचं काही जागरूक ग्राहकच सांगतात.
लाडकी बहीण, निराधार योजना, ई केवायसी, व्यापारी वर्ग, आणि अनेक शेतकरी भारतीय स्टेट बँकेत व्यवहार करण्यासाठी येतात पण पाणी पिण्यासाठी किंवा कृत्रिम आच्छादन करून सावलीची कोणत्याही प्रकारची व्यवस्था दर्शनि भागात केलेली नाही. ढाणकी शहरात काही खासगी पतसंस्थांनी फसवणूक केल्यानंतर या ठिकाणी ग्राहकांना आपल्या रकमेची सुरक्षितता वाटत असल्या कारणाने ग्राहक राजा राष्ट्रीय बँकांकडे आकर्षित होत असताना ग्राहकाला गरज आहे पण बँकेला यांची काही घेणे घेणे नाही असे दिसते. अनेक वयोवृद्ध महिला पुरुष, दिव्यांग व्यक्तीना या ठिकाणी व्यवहारास आले असता तासनतास लागतात पण समोरील असणाऱ्या मोकळ्या जागेत मात्र कृत्रिम आच्छादनाची व्यवस्था उपलब्ध करून ग्राहकाला दिलासा देणे गरजेचे असताना मात्र येथे दुर्लक्षित धोरण अवलंबून बँकेचे मालक असणाऱ्या ग्राहकाला दुजेपणाची वागणूक मिळत असल्याचे दिसत आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या ढाणकी शाखेमध्ये एक पाटी आतील भागात प्रामुख्याने दिसते त्यात ग्राहकाने कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केल्यास काय कारवाई होऊ शकते असे नमूद केलेले आहे. पण एखादा कर्मचारी जर ग्राहकांसोबत चुकीचे वागले त्या क्षणी त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होऊन कुठे तक्रार करायला पाहिजे असे सुद्धा असायला हवे मात्र असा फलक लावण्याचे कष्ट तेथील यंत्रणा घेईल का?? प्रत्येक वेळेस चूक आणि आरोपी अपराधी पणाच्या भूमिकेत ग्राहकच असतो म्हणून साहेब व त्यांचे कर्मचारी ग्राहकांसोबत गैरवर्तन केल्यास त्यांची तक्रार व कोणती कारवाई होऊ शकते अशा प्रकारची पाटी लिहून ठेवतील??.