
सहसंपादक : रामभाऊ भोयर
इंदिरा गांधी कला महाविद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनी, प्रश्नमंजुषा, रंगोली स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.वाय. शेख यांनी भुषवले व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. किशोर सुरडकर यांनी प्रत्येक नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले प्रमुख पाहुणे आर. एम. इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक श्री शुभम सर व शिंदे सर यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व सांगितले. तसेच प्रमुख पाहुणे भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक कपिल जगताप यांनी रमण इफेक्ट बद्दल वर सर सी व्ही रमण यांच्या बद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक मोहनीश वानखेडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक निलेश देशमुख सर यांनी केले.
