
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आज दि.२२/२/२०२६ रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय यवतमाळ येथे भाजपा जिल्हा अध्यक्ष ॲड.प्रफुलभाऊ चौहान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आले होते.बैठकीमध्ये भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा कार्यकारणी विषयावर चर्चा करण्यात आली आणि जिल्हा कार्यकारणी स्थापन करून भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रफुलभाऊ चौहान यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले.या बैठकीला श्री.राजुभाऊ पडगीलवार(भाजपा जिल्हा महामंत्री),सौ.कोटेकर ताई(भाजपा जिल्हा महामंत्री), श्री.दिलीप मलांडे (जिल्हा अध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा यवतमाळ) ,श्री.शंतनुजी शेटे(भाजपा जिल्हा कार्यालय प्रमुख) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.जिल्हा कार्यकारणी खालीलप्रमाणे….
१) श्री.दिलीप मलांडे (अध्यक्ष)
२) श्री.संदीप पेंदोर (महामंत्री)
३) श्री.राहुल सोयाम (महामंत्री)
४) श्री.मनोज केळकर(महामंत्री)
५) श्री.देविदास मानगी (उपाध्यक्ष)
६) श्री.संतोष बोरचाटे (उपाध्यक्ष)
७) श्री.राहुल टेकाम (उपाध्यक्ष)
८) श्री.संदीप मेश्राम (उपाध्यक्ष)
९) श्री.नितीन श्रीरामे (सचिव)
