
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 14/03/2025 रोजी गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे इकोफ्रेंडली होळी साजरी करण्यात आली. हा उपक्रम सामाजिक वनीकरण विभाग व राष्ट्रीय हरित सेना युनिट कडून राबविण्यात आला, त्यासाठी राष्ट्रीय हरित सेनेचे कार्यक्रम अधिकारी संदीप सुरपाम व वनीकरण विभागाचे नस्करी सर व सरनाईक सर यांनी या मागची भुमिका विषद केली, पर्यावरणाला हानि न पोहचविण्याची शपथ सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली, पर्यावरण पूरक होळी पेटविण्याचा जबाबदारी अजय नरडवार सर यांनी पार पाडली,सर्व विद्यार्थ्यांना मटर पुलाव व जलेबी देऊन पळसाच्या फुलांपासून बनविलेले नैसर्गिक रंग उधळुन कार्यक्रमाची सांगता झाली..
कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करुन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून तो एक चांगला नागरिक कसा बनेल त्यादृष्टीने प्रयत्न केला गेला…
हा उपक्रम कु मेघना गुंडकवार,रेंज फॉरेस्ट ऑफिसर व प्राचार्य राजेश शर्मा यांचे मार्गदर्शनात राबविण्यात आला…
