
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत आष्टा येथील भीमराव देवराव कांबळे यांनी मध्यवर्ती सहकारी बँक शाखा राळेगाव येथून आपल्या बँक खात्यातून दिं. २ मार्च २०२५ रोज बुधवार ला ५०’००० रुपये काढले असून त्यांनी दुचाकीच्या हँडलला लटकवलेल्या पिशवीतून अज्ञांत चोरट्याने ५०,००० रुपये लंपास केल्याची घटना क्रांती चौक येथे घडली आहे.
भीमराव कांबळे यांनी मध्यवर्ती बँकेतून ५० हजार रुपये काढले असता त्यामध्ये ५०० व १०० च्या नोटा होत्या व त्यांनी पैसे काढल्यानंतर स्वतः जवळ असलेल्या बॅगमध्ये टाकले व ही बॅग एका पिशवीत ठेवली व कांबळे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच २९ ए एफ ७९६८ स्पेलंडर गाडीच्या हँडला पिशवी लटकवून क्रांती चौकातील ५:३० दरम्यान पुरोहित बिकानेर दुकानासमोर पोहोचले. गाडी उभी करून त्यांनी दुकानातून समोसा पार्सल घेतले त्यानंतर जवळच असलेल्या चहा कॅन्टीन येथे चहा पिण्यासाठी थांबले. चहा घेतल्यानंतर ते आपल्या गावी आष्टा येथे परतले. घरी पोहोचल्यावर बॅग उघडून पाहिल्यावर त्यांना पैसे दिसले नाही.तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मी बिकानेर दुकानासमोर गाडी उभी असताना किंवा चहा घेत असताना त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने बॅगेतून ५०,००० रुपये चोरून नेले असून या याबाबतची तक्रार पोलिस स्टेशनला दिली असून पोलिसांनी अज्ञात ईसमा विरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास राळेगाव करीत आहे.
