
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे वर्ग पाचवी चा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केल्या गेला होता. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये जे यश मिळविले त्या गुणवंत विद्यार्थ्यांचे ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री निलेश भाऊ गुजरकर यांनी भूषविले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून गावच्या प्रथम नागरिक श्रीमती वानखडे ताई या उपस्थित होत्या. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीमती धोटे ताई श्री नामदेवरावजी हुलके आणि गावचे पोलीस पाटील श्री समीर भाऊ गुजरकर हे उपस्थित होते.तसेच पिंपळगाव शाळेला तीन महिने सेवा देणारे श्री वनकर सर यांचा देखील सत्कार करण्यात आला. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.यामध्ये प्रथम क्रमांक मंथन निलेश गुजरकर, द्वितीय क्रमांक भुनेश्वरी दत्तू टेकाम तसेच तृतीय क्रमांक अर्णव समीर गुजरकर या विद्यार्थ्यांनी मिळविला. याप्रसंगी शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री समीर दौलत्कार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री गुप्ता सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका श्रीमती महाकुलकर मॅडम यांनी केले.
