
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मारोती रिठ देवस्थान, धोटे महाराज संस्थान पार्डी ता.कळंब येथे दि.23 एप्रील रोजी कलावंत न्याय हक्क समिती तालूका शाखा कळंब तथा कोठा- वेणी येथील महीला पूरूष भजनी मंडळाच्या संयूक्त विद्यमाने कलावंत वारकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला,हभप मूक्ताई सरडे कोठा ह्या अध्यक्षस्थानी होत्या. ऊदघाटन मा.विभाताई भोरे ह्यांनी केले,ह्या प्रसंगी कलावंत न्याय हक्क समितीचे राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे ह्यांनी कलावंतांना संबोधीत केले.शासकीय कलावंत समिती गठीत न झाल्याने जेष्ठ कलावंताचे तिन वर्षापासून चे प्रस्ताव रखडून पडलेली आहेत, मूख्यमंत्री वारकरी महामंडळ शासनाने जाहीर करून एक वर्षाचा कलावधी होत आहे मात्र अंमलबजावणी सूरू केल्या गेली नाही,कलावंतांचे मानधन त्यांच्या खात्यामधे तीन महीण्यापासून मिळाले नाही,ई.गंभीर प्रश्नावर प्रशासनाचे व शासनाचे दूर्लक्ष होत आहे,जिल्हाचे सध्याचे ईष्टांक वाढवून दूप्पट करावे,वयोमर्यादा चाळीस व ऊत्पन्नाची अट एक लाख रूपये पर्यत करावी ई.मागण्यासाठी कलावंत न्याय हक्क समिती आग्रही आहे.मात्र शासन दखल घेत नसल्याने कलावंतांमधे प्रचंड रोष व निराशा पसरली आहे. शासनाचे लक्ष आपल्या न्याय्य मागण्याकडे वेधण्यासाठी पून्हा ताकदीने संगठण वाढवून आंदोलनात ऊतरण्याची गरज आहे , त्यासाठी आपण सर्वानी सज्ज असावे असे आवाहन केले.
ह्या प्रसंगी समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष सिध्दार्थ भवरे,संघटक अशोकराव ऊम्रतकर,ऊपाध्यक्ष गूणवंतराव लडके,महासचीव रमेश वाघमारे,मनोहरराव मिठे मार्गदर्शक हभप.दिगांबर गाडगे,राळेगाव तालूकाध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक गंगाधरजी घोटेकर,सूरेश भाऊ कूबडे,हभप.राधाताई सावरकर ई.नी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक कळंब तालूकाध्यक्ष वासूदेवराव दाभेकर यांनी तर आभार हभप. दिगांबर गाडगे ह्यांनी मानले.
गायक रमेश वाघमारे,ऊत्कृष्ट ढोलक वादक हंसराज तलवारे,नारायण राव कूंभेकर ह्यांच्या बहारदार शैलीतील गाण्याने कलावंतामधे ऊर्जा भरली, मा.नरेश महाराज,बंटीभाऊ धोटे,सै.यूसूफ अली,जयंत नाटक,अर्चनाताई भोयर,शारदाताई आत्राम,वंदना ताई माहूरे,दामोधर बोबडे,पूंडलीकराव मेश्राम,
ऊज्वला टोणे, हभप. बोटरे महाराज,गजाननराव धनूस्कर,किशोरराव गावंडे,हभप.देवदत्त आढाव महाराज,हभप.वसंतराव धोटे महाराज,वामनराव कोल्हे,ज्ञानेश्वर गावंडे,संतोषराव दरणे,सूनिता कोटधावले,सूलोचना मेश्राम,पांडूरंगजी ईजपाडे,संगीता खूजे,महादेव वानखडे,मोहनराव येडे, दूर्गाप्रसाद नेहारे,ई.जेष्ठ कलावंत वारकरी ह्यांचा प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.कळंब तालूका कार्याध्यक्ष,मारोतराव आत्राम ज्ञानेश्वर बोबडे,रमेशराव फूलकर,मनोहरराव दरणे,बाबाराव राऊत,पवनभाऊ टोणे,सौ मिराताई वाघ,किशोर डोंगरे,ऊत्तमराव बावणे,निकेश पाटील,व समस्त पदाधिकारी ह्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथक परीश्रम घेतले. कोठा येथील भजन मंडळाच्या राष्ट्रवंदनेनी कार्यक्रमाची सांगता झाली.
