
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
अनेकांचे शिक्षण घेण्यामध्येच व पदवी प्राप्त करण्यामध्ये बराच काळ जातो. पण जितेश सरांनी अगदी थोड्याशा कालावधीमध्ये अनेक पैलू आपल्या जीवनात घडविले त्यामुळे असे मनावे वाटते की “बिंब जरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे” असे सरांकडे बघून वाटते.
कार्यकर्तृत्वाची उत्तुंग भरारी घेऊन सुद्धा समाजाप्रती काहीतरी करणे अशी इच्छाशक्ती बाळगून ती कृतीत उतरवणे तसे कठीणच; अनेक व्यक्ती मोठ मोठी स्वप्ने पाहतात. ती पाहणे सोपे जरी असले तरी सत्त्यात उतरवणे व त्या प्रति प्रामाणिकपणे प्रयत्न करणे सोपे नसते यात अनेक अडथळे येतात ते अडथळे दूर सारून आपल्या कामात सातत्य ठेवून यश प्राप्ती करणारी व्यक्ती फार थोडी अशी असतात त्यातीलच जितेश सर की जे आपल्याला हवे ते यश मिळवतात. बहुतांश व्यक्ती यशश्री प्राप्त झाल्यानंतर सुद्धा समाजाप्रती कर्तव्य विसरून जातात. आदरणीय सरांनी एवढ्या कमी वयात ध्येय गवसणी घातली तरी आपले समाजाप्रती कर्तव्याची जाण ठेवून व कर्तव्य करत असताना कोणत्याही प्रकारचा बडेजाव पणाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य कर्म निरंतरपणे चालूच ठेवले. यवतमाळ जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रात सुद्धा अनेक पतसंस्था बंद पडत असताना अशा कालखंडामध्ये स्वतःला टिकवणे फार मोठे जिकिरीची असते पण आत्मविश्वासाने व स्वकर्तुत्वाच्या बळावर सर या परिस्थितीला सुद्धा सामोरे जात आहे हे विशेष बाब आणि एक दिव्यच म्हणावे लागेल.अशा चतुरस्त बहुरंगी बहूआयामी हरहुन्नरी तरुण उद्योजक म्हणून का संबोधू नये.
जितेश भाऊंना समाजासाठी काहीतरी करावे हा वारसा त्यांच्या आई-वडिलाकडूनच लाभलेला आहे ते समाजाविषयी कार्य करायचे असते ते काम करत असताना चित्ताच्या एकाग्रतेने रममान होऊन तनमन यासह समर्पण असणे गरजेचे असते केवळ आर्थिक सुबत्ता असून चालत नाही. आणि यातच त्यांची सचोटी कायम राहिलेली आहे. अगदी काही दिवसांपूर्वी भाऊंचा वाढदिवस झाला तो वाढदिवस साजरा करीत असताना आपल्या आप्तेष्टांसह मित्रमंडळींना मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन वाढदिवस साजरा केला असता पण या सर्व बाबीला बाजूला सारून एका सामाजिक संस्थेमार्फत येथील अनेक गरजू व्यक्तींना पोटभर असे मीष्ठांनाचे भोजन देऊन एक उत्तम माणुसकीचे दर्शन घडवले. खऱ्या अर्थानं माणुसकी स्पृहणीय आहे. आज-काल समाजाच्या वेधक वेधक व्यक्ती फार कमी त्यातीलच एक भाऊ होय सध्या महाराष्ट्रासुह देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा ब्रह्मराक्षस गोगावत असताना हजारो तरुण कामासाठी इतर शहरात भरकटत असताना भाऊंनी अनेक तरुणांना आपल्या नागरि संस्थेमध्ये नोकरी देऊन कामाला लावले. त्यामधून अनेकांना रोजगार मिळाला व भाऊंनी दिलेल्या कामामुळे अनेकांची संसार उभे राहिले तर कुटुंबाचे पालन करते सुद्धा झाले ज्यावेळी कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आली म्हणजे शासनाच्या मदतीची वाट न पाहता जितेश भाऊ स्वतः हा रस्त्यावर उतरून मदत केल्याचं अनेक वेळा बघायला मिळाल. त्यातील एक विषय म्हणजे बेवारस व्यक्तींना कोणीही बघत सुद्धा नाही पण भाऊंनी अनेक वेळा अंतिम संस्कार साठी निधी उपलब्ध करून दिला हे विशेष.
म्हणून काही उक्ती मांडाव्या वाटतात.
जगाचे कल्याण हीच खरी भक्ती उपकार सेवा हीच खरी मुक्ती ठाई ठाई त्यांचे रूपे ही अनंत
ऋणाईत
श्रीरंगबाप्पा देवधर.
