
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अंगणवाडी केन्द्रं मौजा जळका तालुका राळेगाव येथे दिनांक ६ मे २५ रोजी बालविवाह होणार आहे अशी माहिती जिल्हा महिला बाल कार्यालयाचे श्री फाल्गुन पालकर यांनी श्री सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी राळेगाव यांना दिली. विठाळकर यांनी ताबडतोब याबाबतीत खरी माहिती काढण्याबाबत ग्रामपंचायत सचिव दिपक धनरे यांना पाठविण्यात आले व त्यांनी १ मे रोजी घरी जाऊन भेट दिली. परिवारातील सदस्य व वडीलाची यांची भेट घेतली व दिनांक ६ मे २५ मुलीच्या वयाबाबतचा पुरावा मागीतला. तेव्हा घरातील वडील यांनी समजदारी घेऊन मुलीच्या वयाबाबत आम्हाला पुरेपूर माहिती नसल्याने आम्ही विवाह जोडला परंतु आज आम्हाला जी माहिती मिळाली त्यामुळे आम्ही दिनांक ६ मे रोजी होणार विवाह रद्द करत आहोत. आम्ही हा विवाह करणार नाही असे सांगितले.
ताबडतोब ही माहिती मा. विशाल जाधव महीला व बाल विकास अधिकारी यवतमाळ तसेच मा.अमित भोईटे सर तहसीलदार राळेगाव , गटविकास अधिकारी मा. केशव पवार सर मा. देवेंद्र राजुरकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यवतमाळ यांना देण्यात आली. तसेच याबाबतीत सागर विठाळकर यांनी श्री अविनाश पिसुरडे सरंक्षण अधिकारी संस्थात्मक यवतमाळ यांना टिमसोबत जळका येथे बोलावण्यात आले ,सपुर्ण टिम गावामध्ये दाखल झाली. टिमने याबाबतीत मार्गदर्शन करुन नोटीस बजावण्यात आली. तसेच मुलीला बाल कल्याण समितीसमोर बोलावण्यात आले.
यावेळी,सरपंच सुशीला तुमराम, सचिव दिपक धनरे, अविनाश पिसुरडे यवतमाळ,फाल्गुन पालकर चाईल्ड लाईन प्रमुख,अंगणवाडी सेविका सावित्रा पवार यांची उपस्थिती होत्या.
मुलाचे वडील यांना प्रशासनाने बालविवाहाचे दुष्परिणाम समजाऊन सांगितले त्यामुळे आई वडील यांनी स्वखुशीने विवाह न करण्याबाबत निर्णय घेतला.त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व नागरिकांनी देखील बालविवाहा सारख्या चुकीच्या प्रथेपासून दूर रहावे असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
स्थानिक प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दिनांक ६ मे रोजी होणारा बाल विवाह थांबविण्यात आला याबाबतीत स्थानिक व तालुका प्रशासनाला यश मिळाले.
