
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अमरावती शिक्षण विभाग अमरावती वर्ग 12 वी निकाल आज दुपारी एक वाजता घोषित झाला. श्री लखाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव चा वर्ग बारावीचा निकाल 86.20 टक्के असून राळेगाव तालुक्यात तिन्ही शाखेमध्ये कुमारी प्रतीक्षा खंडाळकर हिने 87.20 टक्के गुण घेऊन राळेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. तर कनिष्ठ महाविद्यालयातून द्वितीय क्रमांकाने प्रज्वल रेंगे 75.60 टक्के , तृतीय क्रमांक कु.श्रद्धा आत्राम 75.20 टक्के गुण घेऊन कॉलेजमधून तिसरा क्रमांक पटकाविला. अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री. दिलीपराव कोल्हे, उपाध्यक्ष आशिष दादा कोल्हे, सचिव रोशन दादा कोल्हे, सहसचिव भरतभाऊ पाल तथा संचालक चित्तरंजनदादा कोल्हे, दिलीपराव देशपांडे, शशीशेखरजी झाडे ,गुलाबराव महाजन, सुरेशभाऊ गंधेवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर कनिष्ठ महाविद्यालयात काम करणारे प्रा.सौ. कुंदा काळे मॅडम, प्रा. श्री रंजय चौधरी , प्रा.सौ वंदनाताई वाढोणकर तसेच शाळेचे इतर शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले शेवटी प्राचार्य श्री विलास निमरड सर यांनी या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अशा सत्कार प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते होते.