
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यासह राळेगाव तालुका हा शेतकरी आत्महत्येसाठी जगात कुप्रसिद्ध झाला आहे याला कारणही तसेच आहे सततची नापिकी, अस्मानी सुलतानी संकटांचा मारा यामुळे शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे अशातच भरीस भर म्हणुन परराज्यातील बोगस व निकृष्ठ दर्जाचे बियाणे जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात मोठ्याप्रमाणात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात आर्थिक लुट चालु आहे. हे बोगस बियाणे महाराष्ट्र राज्यात विकायची परवानगी नसतांना सुद्धा बिनबोभाट पणे व खुलेआम विकल्या जात आहे त्यामुळे आपण एका पथकाची निर्मिती करून राज्याच्या सिमेवर परराज्यातून येणाऱ्या या बियाणे, रासायनिक खते यांच्या गाड्या तपासुन जप्त कराव्या तसेच जे कृषी केंद्र चालक बोगस बियाणे, रासायनिक खते विकुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास मजबुर करीत आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे केली आहे. कृषी विभागामार्फत तालुक्यातील कृषी केंद्रांमधुन बोगस बियाणे तपासणी करण्यासाठी नमुने गोळा केले जावुन ते तपासणीसाठी पाठविले जातात परंतु त्याचा कोणताच अहवाल जसे कोणत्या बियाणे कंपनीची उगवण क्षमता किती आहे ?याची कोणतीही माहिती कृषी विभाग शेतकऱ्यांना देत नाही. त्यामुळे प्रशासनाने गोळा केलेल्या नमुन्यांचा अहवाल प्रत्येक कृषी केंद्रावर लावुन त्यावर कंपनी नुसार उगवण क्षमता किती टक्के आहे ?याची माहिती देण्यात यावी.
राळेगाव तालुक्यात बोगस बियाणे, रासायनिक खते विक्रेत्यांवर व पुरवठादारांवर कारवाई न झाल्यास शेतकरी हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. सदर निवेदनाची प्रत राज्याचे कृषिमंत्री, जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी, स्थानिक कृषी अधिकारी व पं. स. कृषी विभाग यांना देण्यात आले.
यावेळी तुषार वाघमारे, रोशन गुरूनुले, गणेश नागोसे, सुहास उमाटे, पुरषोत्तम खंगारे, अशोक गेडाम, अंबादास झाडे, सहिल मोहिजे, अथर्व काकडे, अरुण जुमनके, एकनाथ मानकर यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.
Box
भरारी पथक फक्त दिखावा, कारवाई रसदपुरवठ्यानुसार?
कृषी विभागाने तयार केलेली भरारी पथके ही केवळ थातुरमातुर कारवाई करत असून, आर्थिक रसद नसलेल्या कृषी केंद्रांवरच केवळ कारवाई केली जाते, त्यामुळे संपूर्ण विभागात सर्व कृषी केंद्रांवर छापे टाकून गोडाऊन तपासणी करण्याची मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी केली आहे.
