सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा शाखा यवतमाळ चे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन शेतकरी मंदीर,वसंत जिनींगचे सभागृह, वणी येथे दि.३ जुन २०२५ रोजी मंगळवारला होणार आहे.सदर अधिवेशनाला मार्गदर्शक म्हणून कॉ.तुकारामजी भस्मे(अमरावती),राष्ट्रीय कौन्सिल सदस्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे राहनार आहे तर किसान सभेचे राज्य कौंसिलर कामगार नेते कॉ.अनिल हेपट(वणी)भाकपचे जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे कॉ.प्रदिप नगराळे(दिग्रस) हे उपस्थित राहणार आहे. अधिवेशनात राजकीय, सामाजिक, सध्याचे शैक्षणिक धोरण, सरकारच्या किसान, कामगार, कर्मचारी,जनविरोधी धोरणावर चर्चा करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षांत पक्षाचे कार्याचा आढावा घेऊन भविष्य काळात जनतेच्या समस्यावर कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे.अधिवेशनाला शेतकरी, शेत मजूर, कामगार, पक्ष सभासद, पक्षाचे सहानुभूतीदार यांनी ३ जुनला सकाळी ११ वाजता वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन कॉ.सुनिल गेडाम,कॉ.दिवाकर नागपुरे, कॉ.ईश्वर दरवरे,कॉ.संजय भालेराव,अॅड.अरुण जवके,कॉ.पी.जी.गावडे,किशोर कदम, कॉ.अमोल गौरशेट्टीवार , कॉ.निखील टोपलेवार कॉ. दिलीप महाजन,कॉ. गुलाब उमरतकर, कॉ.दिपक माहुरे, कॉ.साहेबराव राऊत,कॉ.हीम्मतराव पाटमासे,राकेश खामणकर,मोरेश्वर कुंटलवार,छाया गावंडे,मिलींद रामटेके,भारत केमेकार,शंकर केमेकार,हरीष,प्रा.धनंजय आंबटकर,गंगाधर गेडाम,सुरेखा हेपट,दिनेश शिट्ट लवार,गणेश कळसकर,रवी गोरे,पांडुरंग ठावरी,यास्मीन सुलतान शेख,अरुण साळवे,बबन लखमापुरे,आदींनी केले आहे.
