
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कृषी संस्कृतीचा बैल हा एक महत्वाचा आधार स्थंभ आहे. बैलाच्या श्रमातून कृषी संस्कृती आकारास आली, संपन्न झाली. म्हणून पोळा या सणाला कृषी वेवस्थेत महत्वाचे स्थान आहे. बैल पोळ्या नंतर येणाऱ्या तान्हा पोळा हा देखील याच उद्देशाने साजरा करण्यात येतो. लहानपणीच नांदी बैलाच्या माध्यमातून बैलाच्या श्रमाची जाणीव विकसित व्हावी हा एक उद्देश तान्हा पोळ्याचा असतो. राळेगाव तालुक्यातील प्रभाग क्र.6, 7 व 8 मातानगर येथे हा तान्हा पोळा मोठ्या उत्साहात पार पडला
माता राणी दुर्गोत्सव मंडळ स्टेट बॅन्केच्या बाजुच्या ओपन स्पेसमध्ये तान्हा पोळ्यात शेकडो बालगोपाळांनी अत्यंत आकर्षक नांदी बैल सजवून आणले. या ठिकाणी तान्हा पोळा पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी हजेरी लावली.
यावेळी ज्येष्ठ नागरिक व महिला तसेच माता राणी दुर्गोत्सव मंडळाचे सदस्य व महिला मंडळ यांच्या उपस्थित संपन्न झाला.
तान्हा पोळाला सहकार्य देनगी दाते मंडळी उपस्थित होते.
तान्हा पोळा यशस्वि करण्याकरीता माता राणी दुर्गोत्सव मंडळ सर्व युवक मंडळी यांचा सहभाग होतो.
