
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गणपती बाप्पा मोरया…अशा जय घोषाने
लाडक्या बाप्पाचे स्वागत आणि निरोप घेताना गुलालाची उधळण केली जाते . याच गुलालात केमिकल असतात . ते गुलाल नाका – तोंडात गेल्याने घातक ठरू शकतात . शिवाय गुलाला मुळे दोन समाजात तेढ ही निर्माण होऊ शकते . हे सर्व टाळण्यासाठी गणेश भक्तांनी गुलाल ऐवजी फुले व फुलांच्या पाकळ्यांच्या वापर करावा असे आवाहन पंकज वानखेडे यांनी केले आहे. गणेशोत्सव आणि आगामी नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने नियमावली जाहीर केली असून त्याचे पुस्तकही नागरिकांना देण्यात आले आहे. लाडक्या गणरायाचे आगमन झाले. गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आनंदात आणि जल्लोषाच्या स्वागत केले आहे. यावेळी अनेक मंडळांनी गुलाला ची उधळण केल्याचे दिसले. तसेच काही ठिकाणी गुलाल अंगावर पडल्याने व इतर कारणांनी बाचाबाची तसेच तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेतली व ही प्रकरणी शांततेने मिटवली . परंतु आता विसर्जन मिरवणुकीत असे प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तथा सामाजिक कार्यकर्ते , ज्येष्ठ नागरिक पत्रकार , यांनी गणेश मंडळ व भक्तांना आवाहन केले आहे. यावर्षीच्या गणेशोत्सव डीजे मुक्त आणि गुलाल मुक्त करावा , डीजे ऐवजी पारंपारिक वाद्य आणि गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करावी , असे आवाहनही पंकज वानखेडे यांनी केले आहे.
शांतता ठेवून जनतेने आतापर्यंत पोलिसांना सहकार्य केलेले आहे. सर्व मिळून सण उत्सव साजरे केले जातात. यापुढेही नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन न करता शांततेने उत्सव पार पाडावा . गणेशोत्सव व आगामी नवरात्री उत्सव अनुषंगाने नियमावली जाहीर करण्यात आली आहे. गणेश भक्तांनी या वर्षीचा गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करावा तसेच शक्य झाले तर गुलाला एवजी फुले किंवा फुलांच्या पाकळ्यांची उधळण करावी :- पंकज वानखेडे
