
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडली असून पिकाची वाढही खुंटली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता पिकाला युरिया देणे गरजेचे असताना ऐनवेळी शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. मात्र याबाबत कृषी विभाग मात्र निद्रावस्थेत दिसून येत असल्याची ओरड शेतकरी करीत आहे.
शेतकरी युरिया करिता कृषी केंद्रात गेले असता युरियाची मागणी करताना कृषी केंद्र चालका कडून (ग्रामीण भागातील) युरिया पाहिजे असल्यास पोटॅश किंवा इतर खते घ्यावी लागतील असे सांगितले जात आहे. याबाबत कृषी विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले असताना सुद्धा याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून केला जात आहे. तसेच युरिया मिळत नसल्याबाबत कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याही प्रकारची युरियाची टंचाई नाही असे सांगितले आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना युरिया मिळत नसेल तर अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे सांगितले गेले आहे. परंतु प्रत्यक्षात कृषी विभागातील कार्यालयात शेतकरी गेल्यानंतर कार्यालयात अधिकारीच मिळत नसल्याची आरोप शेतकरी करीत आहे .शेवटी नाईलाजाने वापस येऊन शेतकऱ्यांना जास्त दराने किंवा युरिया खरेदी करावी लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे मात्र कृषी विभाग अधिकारी हे कुचकामी ठरत असून कृषी विभाग निद्रावस्थेत दिसून येत आहे तरी जिल्हा कृषी अधीक्षक यांनी वेळीच लक्ष देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे
