
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरघ ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामसभा दिं १७ सप्टेंबर २०२५ रोजी उ संपन्न झाली .
ग्रामसभेला ग्रामस्थ शेतकरी महिला बचत गट सदस्य कृषीसखी युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामसभेच अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच निलेश भाऊ रोठे यांनी भुषविले यात मा मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की या अभियानाच्या माध्यमातून गावात लोक सहभागातून विकासाला गती मिळणार आहे प्रत्येक ग्रामस्थांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा यावेळी विविध विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी कुषि सहायक अंगणवाडी सेविका आशा सेविका तलाठी पोलीस पाटील प्रवीण कळसकार उपसरपंच ग्रामपंचायत वरघ ज्ञानेश्वर डोफे ग्रामसभेच्या आदी उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी एम जी दुधकोहळे यांनी ग्रामसभेत सांगितले कि गावांचा सर्वांनी विकास हा लोकसहभागातून शक्य आहे तेव्हा गावकऱ्यांनी लोकसह भाग वाढवावा ग्राम विकासाठी सहकार्य करावे असे सभेदरम्यान संगितले तसेच ग्रामपंचायत अधिकारी एम जी दुधकोहळे यांनी उपस्थित यांचे आभार मानले .
