
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे युनिक आय ऑप्टिकल यांच्या तर्फे २१ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तज्ञांनी अत्याधुनिक मशीनद्वारे नागरिकांची तपासणी केली.
गावातील मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. तपासणीनंतर गरजूंना कमी दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांना दिलेल्या या मदतीबद्दल नागरिकांनी युनिक आय ऑप्टिकलच्या कार्याचे कौतुक केले.
या शिबिरासाठी डॉक्टर दर्शना मॅडम व मिथुन सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गावातील युवा कार्यकर्ते प्रणय मुडे, स्वप्नील भोयर, शशांक देवतळे, विशाल घोडे, यश भोयर व मित्र परिवार यांनी विशेष सहकार्य केले.
