
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून नागपूर कडून हैद्राबाद कडे आयशर ट्रक वाहनातून गोवंश जनावरांची बैल घेवून जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता आयशर ट्रक जप्त करून न बैलाचे सुटका केले असून वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई वडकी पोलिसांनी दिं.२१ सप्टेंबर २०२५ रोजी देवधरी घाटात रात्री दीड वाजताच्या दरम्यान केली आहे.
नागपुर कडुन हैद्राबाद कडे एम एच ४० सी टी २५०३ या आयशर वाहनातून आठ बैल कत्तली करीता वाहतुक करून घेऊन जात असल्याबाबत गोपनिय माहीती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे वडकी हद्दीतील देवधरी घाटात वडकी पोलिसांनी पो. स्टाफ सह सापळा रचुन सदर वाहन थांबवून वाहनाची पाहणी केले असता त्यात ८ नग बैलं जातीचे दिसून आले असून प्रत्येकी किंमत २५०००/-रू प्रमाणे एकुन २ लाख रुपये आणि २० लाख रूपये आयशर ट्रक वाहन असा एकुन २२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी नामे 1) मोहसिन खान मुजफ्फर खान वय 28 वर्षे रा. चंगेरा ता.जि. गोंदीया 2) आयान सय्यद हमीद सय्यद वय 21 वर्षे रा. राजेगांव ता.जि.गोंदीया यांचे ताब्यातुन मिळुन आला आहे. त्यांना सदर बैल कोनाचे आहेत याबाबत विचारणा केली असता त्यांनी ती अब्दुल अजीज शेख, रा. नागपुर यांचे असल्याबाबत सांगीतले. वरून पो.स्टेला. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम ५’५ (अ), ५ (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदरची कार्यवाही मा. जिल्हा पोलीस अधिक्षक शकुमार चिंता सा. व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक थोरात सा. आणि सहा. पोलीस अधिकक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारीत पांढरकवडा . रॉबीन बंन्सल सा. यांचे मार्गदर्शनात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे, पोलीस अंमलदार स. फौ.८२७ रमेश आत्राम, पो.हवा. २२१४ भोजराज करपते, पो.हवा. १८२३अमोल चौधरी, पोकॉ.२३८३ अरविंद चव्हाण, पोकॉ.२५९८ विनोद मोतेराव चालक स. फौ.७१६ दिपक मडकाम यांनी पार पाडली.
