
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत दिनांक 22/9/2025 रोज सोमवारला दुपारी ठिक तीन वाजता शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी आणायचा असल्यास नोंदणी मोबाइलद्वारे कशी करावी याबाबत वरूड जहांगीर येथील ग्राम पंचायत कार्यालयात मोबाईलवरून रूपेश लाकडे यांनी सांगितले सोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुजित चल्लावार यांनी अगदी सरळ आणि सोप्या भाषेत शेतकरी कशी नोंदणी करू शकतो हे समजावून सांगितले.सोबतच नोंदणी करताना ज्या शेतकऱ्यांकडे एनड्राईड मोबाईल असेल त्यावरून कमीत कमी पाच शेतकऱ्यांची नोंदणी करता येते. सोबतच ही नोंदणी आपण स्वतः आपल्याच मोबाईलवरून करता येते.अशाप्रकारे सविस्तर माहिती दिली. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुजित चल्लावार, रूपेश लाकडे, विनोद झामरे, निलेश तायडे, साईनाथ ताठे तसेच वरूड जहांगीर येथील रहिवासी तथा खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते, वरूड जहांगीर येथील पोलिस पाटील नरेंद्र चव्हाण, उपसरपंच कवडू मरस्कोल्हे, मनोज राठोड, प्रमोद भोरे,अजय निमट, सदाशिव चव्हाण, जयसिंग पवार तुषार राठोड, मयूर राठोड, संजय राऊत नितीन उईके व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम वरूड जहांगीर येथील ग्राम पंचायत कार्यालयात संपन्न झाला.
