
प्रतिनिधी/शेख रमजान
ढाणकी मध्ये सगळे नवरात्र उत्सवच्या तयारीत असताना त्याच दिवशी वासनांध शिक्षकाच्या अत्याचारामुळे एका १७ वर्ष लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला, आरोपीने त्याच्या ट्युशन च्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बळी बनवल. आरोपी शिक्षकाने मागील एक वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केले आणि जेंव्हा ती गर्भवती राहिली तेंव्हा तिला अघोरी गोळ्या देऊन मृत्यू च्या दारी ढकललं. या घटनेने समस्त ढाणकीवासी संताप व्यक्त करत आहे. या पार्श्वभूमीवर ढाणकी शहर कडकडीत बंद करून त्या पीडिताला न्याय देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनात मागणी केली आहे की,आज गावात प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला शिकवण्यासाठी ज्यांच्यावर विश्वास ठेवून लेकीला शिकविण्यासाठी पाठवतात तोच जर विश्वासघात करत असेल तर आम्ही आमच्या लेकरांची सुरक्षा कशी करावी? ही घटना खूप गंभीर असून समाजातील इतर मुलीला शिक्षणापासून विभक्त करणारी आहे. यामुळे या आरोपीची चौकशी करून याने या मुलीशिवाय इतरही मुली सोबत असेच कृत्य केले की काय याची पडताळणी करून त्यासोबत आणखी कोण आरोपी आहे याचा खोलवर तपास करावे,
तसेच सर्व मुलींच्या पालका मध्ये विश्वासाची भावना कायम ठेवण्यासाठी आणि आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. सदर खटल्या मध्ये विशेष सरकारी वकील म्हणून श्री उज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली यावेळी समस्त ढाणकी वासी यांचा जनसागर ढाणकी पोलीस चौकी येथे लोटला होता. सायंकाळी पीडिता साठी कॅण्डल मार्च काडून ढाणकी वासीयांनी निषेध नोंदवला.
प्रथमता मी पीडिताला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुण या घृणास्पद घटनेचा निषेध करतो.जिथे ज्ञान देण्याचे काम होते तिथे असे घाणेरडे कृत्य करणाऱ्या आरोपीला प्रशासन कडक कारवाई करेलच. त्या पीडिताच्या गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत मी सोडून देणार नाही. मी कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून त्यांना न्याय देण्याचा काम मी करेल.
उमरखेड महागाव मतदार संघ आमदार
किसनराव वानखेडे.
या पीडितेला गर्भपात गोळ्या दिल्या असून ते गोळ्या आरोपीने कुठून आणले याची चौकशी करून त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी. तसेच त्याच्या भावांना सुद्धा यात सहअरोपी करावे.
सामाजिक कार्यकर्ते व नागरिक
