
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
जि.प.उ.प्रा.डिजिटल शाळा,सायखेडा (बु) केन्द्र-येळाबारा पं.स.यवतमाळ या शाळेची वार्षिक तपासणी मा. श्रीमती नलिनी वंजारी मॅडम,विस्तार अधिकारी (शिक्षण),पं.स.यवतमाळ.मा.श्री.प्रविण चिलकुलवार सर,केन्द्रप्रमुख ,केन्द्र- येळाबारा
प्रथम पूष्पगुच्छ देऊन मा.नलिनी वंजारी वि.अ. मॅडमचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर केन्द्रप्रमुख मा.श्री.प्रविण चिलकुलवार यांचे प्रथमच सायखेडा (बु) शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
ज्यांच्यामूळे येळाबारा केन्द्राचे आॅनलाईन कामे पुढे असणे याबाबतचा सतत आढावा घेणे असे अनेक कामात शिक्षकांना अग्रेसर ठेवणारे माजी केन्द्रप्रमुख मा.श्री.शाम माळवे सर यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
📘प्रथम प्रतिज्ञालेख व दाखलखारिज यात गोषवारा सहित तपासणी करण्यात आली.
📗गणवेष वाटप, पुस्तक वाटप रजिस्टर मध्ये जातनिहाय गोषवारा सहित तपासणी करून प्रमाणित केले.
आलेल्या T.C.खारीज केले काय? येथे मार्गदर्शन केले.
📗यानंतर सर्व समित्याची कसून तपासणी व कार्य विचारण्यात आली
१)सखी सावित्री समिती
२)विद्यार्थी सुरक्षा समिती
३)माजी विद्यार्थी समिती
४)इको क्लब
५)प्रहारी क्लब
६)सॅनिटरी क्लब
७)महिला तक्रार निवारण समिती
८)परिवहन समिती….येथे मार्गदर्शन करण्यात आले जसे आपण महामंडळ बसने सहलीचे आयोजन करतो तेव्हा या समितीचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असते.
८)शाळा व्यवस्थापन समिती.
सर्व समितीचे सभावृत्तांत अद्ययावत होते असे प्रमाणित केले.
📗यानंतर विविध शिष्यवृत्ती पाहण्यात आले.
📗वार्षिक निकाल रजिस्टर मध्ये आठही वर्गाचे द्वितीय सत्राचे रकाने आखून झाल्याचे आढळले येथे खूप मोठे समाधान व्यक्त केले.
📘संचयी नोंदपत्रक-यामध्ये प्रथम सत्राची श्रेणी व वजन उंची आढळली व प्रमाणित केले.
📗शिक्षक संचिका,सर्व विषयाच्या क्लासवाईज प्नश्नावली,वार्षिक नियोजन, विशेष बाब-सर्व शिक्षकांचे दैनंदिन पाठटाचण आढळले.
📗विद्यार्थी संचिका-विद्यार्थ्याच्या फाईल्स यामध्ये कला- कार्यानुभव-शारीरिक शिक्षण याविषयी विविध उपक्रमाच्या नोंदी आढळल्या व प्रमाणित केले.
📘अभ्यांगत रजिस्टर मध्ये नोंदी आढळल्या व प्रमाणित केले.
📗शा.पो.आ.स्वयंपाकी व मदतनिस यांचे दैनंदिन स्वाक्षरीपट.
📗स्वच्छतादूत स्वाक्षरीपट
📘खिचडी नमुना आवर्जून तपासण्यात आला.
📗शालेय पोषण आहार -यात दैनंदिनी,आज तांदूळ किती शिल्लक,आज धान्य किती शिल्लक,वजन उंची व तांदुळ व धान्याचा वार्षिक गोषवारा तसेच चव रजिस्टर ह्या सर्व नोंदवह्या आढळून तपासण्यात आले.
📘आरोग्य तपासणी मध्ये सिकलसेल विद्यार्थांचा आढावा घेण्यात आला.त्यानुसार डाॅक्टरांशी संपर्क ठेवावा हा जिव्हाळ्याचा विषय आहे असे नमुद केले.
📘📘📘गाव सर्हेक्षण रजिस्टर यावर्षीचे अद्ययावत असून विशेष बाब म्हणजे यावर्षीचे रजिस्टरमध्ये दाखल विद्यार्थी गोषवारा व संपूर्ण गोषवारासहित “”गाव सर्व्हेक्षण””आढळले व समाधान व्यक्त करून छान म्हटले.(सहकार्य-आशा वर्कर ताई रेखा मेश्राम व अंगणवाडी ताई नंदा डंभारे,मांडवे सर,अर्के मॅडम,वानखडे मॅडम)
📗शिक्षक नोटीस रजि.,शिक्षक सभा रजि.
दस्ताएवज संपूर्ण.समग्र oc.
अशाप्रकारे इतंभूत कार्यालयीन दस्ताएवजाची तपासणी करण्यात आली.(सहकार्य-माजी विद्यार्थी संघ अमर भुरके,व निसार शेख शिक्षण तज्ञ व अध्यक्ष भारतीताई व सदस्य निताताई व वंदनाताई व योगिताताई यांचे सहकार्या बद्दल मु.अ.यांनी सांगितले)
कुठलाही ब्रेक न घेता सकाळी 9.45ते 12.45 या वेळातच सर्वांनी काजुकतली ,मटकी,चिवडा,आंबा कांदा -सांभारची सलाद,गावातील दह्याची लस्सी,भाकरवडी व तूर डाळीची खिचडी सह अल्पोहाराचा आस्वाद घेतला.
अशाप्रकारे मा.वंजारी मॅडम व मा.चिलकुलवार सर यांनी तब्बल तीन तास शाळेची कार्यालयीन दस्ताएवजाची कळत नकळत त्रृट्या लक्षात आणून सूक्ष्मपणे पाहणी करून पुढील भेटीत सर्व वर्गाची गुणवत्ता तपासल्या जाईल अशी तंबी दिली.
यानंतर मु.अ. सविता उईके मॅडम यांनी शाळा व गावाच्या वतीने सर्वांचे आभार मानले. यावेळी शिक्षकवृंद स.अ.देवकी अर्के मॅडम ,प.वि.अ. निरंजन मांडवे सर,स.अ.जागृती वानखडे मॅडम हजर होते.
जातेवेळी या शाळेतील शिक्षकांचा व शा.व्य.स.चा अप्रतिम असा सुरेख संगम या शाळेत पाहावयास मिळाला!!तद् वतच शा.पो.आ.स्वयंपाकी जनाबाई कोडापे व मदतनिस प्रिया पाटील(स्वच्छता) या दोघींचे पण कार्य उत्कृष्ट !!अशी कौतुकाची छाप ठेवत असतांना सायखेडा (बु) शाळेचा “मुख्यमंत्री- सुंदर शाळा-टप्पा ३”
या स्पर्धेत तालुक्यातुन तिसरा क्रमांक आल्याचे प्रथमच जाहीर करून मु.अ.व सर्व शिक्षक यांचे शिक्षण विभागाच्या वतीने स्वागत केले.
गाव व शाळेच्या वतीने धन्यवाद.
💐शिक्षकाचे अध्यापन कार्यावर समाधान व्यक्त करतांना सर्व विद्यार्थ्यांची वार्षिक तपासणी दरम्यान💯% उपस्थिती आढळली याबद्दल शिक्षकांना अधिक मोटीव्हेट केले. पुनश्च:गुणवत्ता विकासाकरिता सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
वार्षिक तपासणी मुळे संपूर्ण रेकाॅर्ड अधिक अपडेट झाला असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
शिक्षकवृंद यांचे वतीने खूप खूप धन्यवाद
