
सहसंपादक : रामभाऊ भोयर
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात झालेला हल्ला लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी टाकलेले पाऊल असून संविधान संपवण्यासाठी मनुवाद्याकडून असले प्रकार होत आहे मात्र आम्ही हा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही या शब्दात आंबेडकर पुतळ्याजवळ राळेगाव फुले शाहू आंबेडकर जनतेच्या वतीने घोषणा निदर्शने केली आहे
सरन्यायाधीश भूषण गवई हे सर्वोच्च पदावर तळागाळातील व्यक्ती विराजमान होतो हेच एका विशिष्ट वर्गाला सहन होत नाही त्यामुळे असे हल्ले केले जात आहेत मात्र आम्ही कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचे हल्ले खपून घेणार नाही सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या सोबत असून संविधान जिंदाबाद हम सब एक है अशा घोषणांनी आंबेडकर पुतळा चौक दुमदुमून गेला होता यावेळी तालुक्यातील फुले शाहू आंबेडकरी जनता यावेळी उपस्थित होते
,शाहु आंबेडकरी जनतेच्या वतीने देशाचे सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात राकेश तिवारी यांनी बुट फेकून मारल्याच्या जाहीर निषेध करुन अँड राकेश तिवारी यांच्या राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गृन्हा दाखल करण्यासाठी राळेगाव पोलीस स्टेशनला निषेध मोर्चा नेऊन राळेगाव पोलीस निरीक्षक शितल मालटे यांना दिले निवेदन.यावेळी वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ, अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल,राजु तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी, प्रदिप ठुने अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी, मिलिंद इंगोले सभापती ख.वि.स.राळेगाव, अंकुश मुनेश्वर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, सुधीर जवादे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, किशोर धामंदे,अँड कीशोर मांडवकर, बबन मांडवकर, सातारकर, राजू महाजन,लिकयत अली,अफसर अली सैय्यद, गोवर्धन वाघमारे, निलेश हिवरकर, मनोज पेंदोर, मधुकर राजुरकर, किशोर गमे,बंडु वेले,राजु मोहुर्ले, विनोद जयपुरकर, दिलीप दुदघिकर, राहुल कुडमेथे,बालु दरणे,राजु पुडके, मधुकर चाफले, तसेच फुले शाहु आंबेडकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
