
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
राळेगाव येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला सहा हजार पाचशे रक्कम पाठविण्यात आली
मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेती उध्वस्त झाली जनावरे मृत्युमुखी पडली घरातील अन्नधान्य भिजवून खराब झाले त्यामुळे हजारो नागरिकावर नैसर्गिक संकट ओढवले आहे या संकटातून सावरण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय राळेगाव येथील ज्येष्ठ नागरिकांनी येथे लिहिला आहे त्यानुसार तेरा संचालकाने प्रत्येकी 500 रुपये निधी गोळा करून 6 500 निधी गोळा केला निधीची रक्कम यवतमाळ येथील समन्वय समिती जेष्ठ नागरिक मंडळ यवतमाळ यांच्याकडे पाठविण्यात आली असून त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी यांच्याकडे पाठविलेली आहे मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकरराव गेडाम उपाध्यक्ष पुरुषोत्तम ओंकार सचिव वाल्मीक मेश्राम कोषाध्यक्ष भाऊरावजी ठाकरे संचालक राजेंद्र कोल्हे नंदकुमार टिपणवार सुरेंद्र जी ताठे भगवंतराव धनरे रामदासजी ससाने अंजली महाले श्रीमती छायाताई राऊत जानरावजी रामगडे आदींनी पुढाकार घेतला.
श्री मधुकरराव गेडाम
अध्यक्ष गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ राळेगाव
संपादक/वार्ताहर
कृपया वरील बातमी प्रकाशित करून आम्हास उपकृत करावे ही विनंती.
