पिंपरी दुर्ग येथे स्पेक्ट्रम फाउंडेशन अंतर्गत वॄक्षारोपण

सहसंपादक : रामभाऊ भोयर

स्पेक्ट्रम फाउंडेशन यांच्या पुढाकाराने पिंपरी दुर्ग येथे दि.१५ /८/२४ रोजी मोठ्या प्रमाणात वॄक्ष‌‌‌ लागवड करण्यात आली आहे गावातील सौ.सरीताताई कोवे सरपंच,श्री.दिलीपराव कोकाटे सर माजी सरपंच, श्री.कुणालभाऊ इंगोले ग्राम पंचायत माजी उपसरपंच, श्री.आकाशभाऊ चाफले तंटामुक्त समिती सदस्य, श्री.नानाजी येडस्कार श्री.किशोरराव कोवे, श्री.सदाशिवराव वाघाडे, श्री.रामुजी झाडे व युवक वर्ग श्री.लक्ष्मण येडस्कार फील्ड ऑफिसर यांनी वॄक्ष लागवडीचे महत्व सांगुन बालमजुरी, नैसर्गिक संसाधने,माती पाणी, सभ्य कार्य, इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली सर्वांनी वॄक्ष लागवड करीता परिश्रम घेतले व वॄक्षाच्या संगोपनाची जबाबदारी घेतली