
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विविध सामाजिक उपक्रम घेत असताना , विधवा महिलांसाठी ” साडीचोळी ” कार्यक्रमाचे आयोजन सेवा आणि संकल्पवादी सामाजिक कार्यकर्ते मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी केले होते* खटेश्वर महाराज देवस्थान हॉल खटेश्वर येथे विधवा महिला आत्मसन्मान सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा नंदु भाऊ कोकुलवार यांच्या अध्यक्षतेखाली हा महिला सक्षमीकरण उपक्रम सोहळा संपन्न झाला, या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून मा डॉ अंजली गवार्ले , पाइल्स हॉस्पिटल यवतमाळ च्या सुप्रसिद्ध डॉक्टर यांच्या विशेष उपस्थितीत ग्राम स्वराज्य महामंच अध्यक्ष मा मधुसूदन कोवे गुरुजी, यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत आम्ही सदैव सहकार्य करतं राहु असे आश्वासन दिले आणि मा श्रीमती आशा काळे, संचालिका ग्राम स्वराज्य महामंच यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भेट म्हणून साडीचोळी देवुन सन्मान केला आणि सर्व विधवा महिलांसाठी महत्वपूर्ण आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मा, कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ तसेच मा विलासराव कन्नाके साहेब, मा संतोषजी शर्मा जोडमोहा यांचा या कार्यक्रमात सहभाग होता वंचित घटकांतिल सामान्य विधवा महिलांना सामाजिक सहकार्य देणे आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कोणी पुढे येण्याची हिम्मत करतं नाही, अशा महिलांच्या अडचणी वाढतं आहे, आणि यांचे समाजात शोषण होत आहे हा अन्याय कुठे तरी थांबला पाहिजे यासाठी ग्राम स्वराज्य महामंच च्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी एक चळवळ उभी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु असे आश्वासन मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी साडी चोळी कार्यक्रमात दिले आहे या साठी चोळी कार्यक्रमात दहा गावातील महिला पुरुष यांनी पुढाकार घेऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यात सहभागी शरद पोफळणी मोहदरी खैरी जोडमोहा वाढोणा ( खुर्द ) हिवरी खटेश्वर सराटी आणि मांडवा येथिल महिला पुरषाचा सहभाग होता या कार्यक्रमात मा श्रीमती आशा काळे, संचालिका ग्राम स्वराज्य महामंच यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला या सेवा संकल्प साडी चोळी कार्यक्रमात प्रामुख्याने सहभागी आणि पुढाकार मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच, मा प्रा मोहण वडतकर, मा गिरीधर ससनकर, चारुदत्त नेरकर, प्रेमा पत्रिवार, भारती शर्मा, प्रल्हाद काळे देविदास टेकाम चंद्रकांत राऊत, दादाराव शिवणकर श्रावण पाडसेनेकुण विश्वास कुभेकर, वसंता चिचकार, मनिराम छाहगड , अनिकेत मुरार रेखा पाळेकर राजु येरमे विष्णु ऊईके बहुसंख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते सर्वांनी सहभोजन करून मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी लोकांचे आभार मानले.
