
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीतील जबाबदार संवेदनशील आणि मुल्याधिष्ठीत नागरिक व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथा फांऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण राज्यात मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने कळंब पं.स.इथे तालुका-स्तरिय मुल्यवर्धन ३.० प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक 17.11.2025ते 19.11.2025 या कालावधीत जीवनदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कळंब येथे नुकताच यशस्वीरित्या पार पडला.
या प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभाला कळंब पं.स.चे गट शिक्षणाधिकारी अमोल वरसे, विस्तार अधिकारी श्रीमती वैशाली चिरडे, सहाय्यक शिक्षक प्रविण कापरतीवार , गणेश ओंकार, महेंद्र खोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रशिक्षनाला तज्ञ सुलभक म्हणून सुनिल थूल, संजय राऊत, आशिष खडसे, वैशाली हजारे, वैशाली उइके, अमितकुमार राठोड, गिता महाकुलकर, प्राजक्ता संगीतराव, स्मिता बोरकर, प्रियंका पोकळे यांनी तीन दिवस उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले.
उद्घाटनप्रसंगाचे सूत्रसंचलन मुल्यवर्धन प्रशिक्षण तालूक समन्वयक कु. शितल आरगुलवार यांनी केले. या प्रशिक्षणाला साधनव्यक्ती कु. कांचन वानखडे व मुथा फांउडेशनच्या तालुका समन्वयक प्रणिता पिसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर प्रशिक्षणात जि .प. व खाजगी अनुदानीत शाळेतील 150 शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
