वाघोबाच्या दर्शनाने धर्मापुर उंदरी जागजई परिसरातील जनता भयभीत


वाघ शोधण्यासाठी दोन दिवसांपासून वनविभागाची धर्मापुर उंदरी जागजई परिसरात शोधमोहीम

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगांव बुधवार च्या रात्रीला धर्मापुर जागजई तसेच वनोजा दापोरी परिसरात वाघ आला वाघ आला अशी चर्चा परिसरात पसरली या वाघाने धर्मापुर परिसरात गायीची शिकार केल्याचे सांगितले आहे त्यामुळे परिसरातील गावातील शेतात जाणारे शेतकरी मजूर वर्ग शेतात जाण्यास घाबरत आहे.
वाघ असल्याची माहिती जागजई, उंदरी येथील नागरिकांनी माहिती वनविभाला दिली असता वनविभागाची जवळपास पन्नास लोकांची टीम धर्मापुर परिसरात येवून वाघाचा शोध घेत आसतांना हा वाघ धर्मापुर वर्धा नदीच्या काठाने असल्याचे सांगितले आहे.हा वाघ हिंगणघाट तालुक्यातील वडनेर परिसरात काही दिवसांपूर्वी वाघाने दहा पंधरा दिवसापासून धुमाकूळ घातला होता त्यानंतर हा वाघ वर्धा नदीच्या थडव्याने येवून धर्मापुर परिसरात आला असावा नदीच्या थडव्याने मोठ्या खाई तसेच जंगल असून या जंगलात राहू शकते असेही वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे .या वाघाला शोधण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपासून शोधमोहीम सुरू केली असून धर्मापुर परिसरात ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
हा वाघ जवळपास चाळीस पन्नास किलोमीटर एक रात्रीला फिरू शकतो त्यामुळे परिसरातील जनतेनी सावध राहावे असे वनविभागाचे अधिकारी टोंगे यांनी सांगितले आहे.