राळेगाव तालुक्यातील वाघाचा धुमाकूळ, दोन दिवसात एक जनावर जखमी तर एकाची शिकार


सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून वाघोबानी दर्शन दिले असून या दर्शनामुळे परत शेतकरी शेतमजूर यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आताच गेल्या दोन दिवसांपूर्वी अंतरगाव येथील शेतकऱ्यांच्या गायीवर हल्ला चढवला त्यात गाय जखमी झाली आणि तेथून वाघोबांनी परत झरगड परिसरात चढाई केली असून झरगड येथील शेतकरी हनुमान वाघाडे शेत वहितीचा बैलावर हल्ला करून आपली भुक भागवली असून आता वाघ कुठल्या परिसरात आहे हे नेमके वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या शिवाय दुसरे कुणीही सांगू शकत नाही. अशातच वाघाबाबत जोपर्यंत खरी माहिती दिली जात नाही तोपर्यंत शेतकरी शेतमजूर शेतात जाण्यासाठी हिम्मत करत नाही.गेल्या काही दिवसांपासून लगातार सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी शेतमजूर अगोदरच परेशान असून नुकताच पाऊस कमी झाल्याने आता शेतात जाण्यासाठी सुरवात झाली होती अशातच वाघोबा टपकल्यामुळे या वाघोबाचा दौरा कुठल्या परिसरात होईल हे सांगता येत नाही. अशातच वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कार्याला गती देऊन वाघाचा बंदोबस्त केला नाही तर आणि अचानक या जनावराऐवजी एखादा माणूस या वाघाची शिकार झाला तर अवनी वाघीनची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशातच विधानसभेचे वारे वाहू लागले असल्याने मतदार संघात अनेक हौसे गौसे उमेदवार अवतरल्याने या सर्वांनी वनविभागाला वेठीस धरून वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी समोर आल्यास ते एक शेतकऱ्यांना सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होईल सोबतच शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळेल करीता माजी मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सर, विद्यमान आमदार प्राचार्य अशोक ऊईके तसेच इतर उमेदवार या सर्वांनी वनविभागाला वेठीस धरून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी राळेगाव तालुक्यातील जनता करीत आहे.