
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर
केळापूर उपविभागात येणार्या घोंडशी पोड येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट दिली, पोडावरील कोणताही व्यक्ति सरकारी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून जात प्रमाणपत्राचे वाटप केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी केळापूर श्री. विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागात आवश्यक प्रमाणपत्र पासून कोणीही वंचित राहू नये म्हणून एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून याअंतर्गत कोलाम पोडावर जाऊन जात प्रमाणपत्र नसलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांना प्रमाणात वाटप करण्यात येत आहे.
पांढरकवडा – शिबला रोडवर असणार्या पारडी गावशिवारात आढळून आलेल्या पुरातन शिळा, जीवाश्म यांची पाहणी केली व याचे संवर्धन व जपणूक करण्याचे आदेश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे, केळापूर उपविभागीय अधिकारी श्री. विवेक जॉन्सन जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. ओमकार सिंग भोंड, केळापुर तहसीलदार कव्हाळे साहेब, झरी तहसीलदार जोशी साहेब व इतर अधिकारी उपस्थित होते.
