निंगनूर फिडर ला एक वाढीव लाईनमन ची आवश्यकता : निंगनूर परिसरातील नागरिकांची मागणी

उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण)

एम. एस. सी.बी. सब डिव्हिजन फुलसावंगी अंतर्गत निंगनूर फिडर मध्ये येणारे गावे इसापूर, पिंपळवाडी, नागेशवाडी, चिंचोली, चिल्ली, निंगनूर (निंगनूर तांडा )अनंतवाडी, चिंचवडी, संकरवाडी, महादेववाडी, संतोसवाडी, असे निंगनूर फिडरला असे बारा वाडी आहेत आणि बारा गावाचे शेती पम्प चे ऐकून 87 डीपी व गावठाणा चे 15 डीपी आहेत आज एवढ्या मोठया निंगनूर फिडर मध्ये हजारो घरा घरात विद्युत पोहोचवणारे हात म्हणजे लाईनमन होय. महावितरणचे कर्मचारी वर्षातील तीनही ऋतू मध्ये त्यांची नोकरी व्यस्त असतें. अनेक अडचणीला आपल्या जीवाची परवा न करता खांबावर चढुन तो विद्युत पुरवठा सुरळीत करून देतो आणि हेच त्यांचा एक मात्र ध्येय असतें कोणत्याही परिस्तीत ग्राहकांना सुरळीत विद्यूत पुरवठा येण्यास थोडासा जरी उशीर झाला कीं अनेक जण लाईनमन यांना फोन लावून लाईन कधी येणार अशी विचार पुच करतात. पण ज्यावेळेस तिथे लाईन नादुरुस्त झाली .आहे तो दुरुतीचा खांब शोधण्यासाठी तो चार ते पाच किलोमीटर फिरून बिगाड दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत कसा होइल याचा विचार करतोय आज एवढ्या मोठया निंगनूर फिडर मध्ये लाईनमन अमरदीप सावते वरिष्ठ तंत्रज्ञ हे संपूर्ण फिडर सांभाळून त्रस्त झाले असून आज रोजी मार्च च्या वसुली चे पण काम त्यांच्याकडे असल्याने एकट्याने काम करायला अडचण होत आहे. निंगनूर परिसरामधून नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे तरी श्री संजय आडे साहेब कार्यकारी अभियंता पुसद व श्री विनोद चव्हाण साहेब उप. कार्यकारी अभियंता महागांव व तसेज श्री गोपाल मुडे साहेब प्रभारी सहाय्यक अभियंता फुलसावंगी, गजानन शिंदे साहेब प्रधान तंत्रज्ञ फुलसावंगी यांनी निंगनूर फिडर असे परिसरात एक वाढीव देण्यात यावा असे नागरिकाकडून सांगण्यात येत आहेतरी साहेबांनी निंगनूर फिटरचा विचार करून एक दुसरा कर्मचारी देण्यात यावा अशी मागणी होत आहे.