
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील शेवटच्या टोक वर असलेल्या दहेगाव येथे आज दि 21 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून गावालगत नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला तर गटविकास अधिकारी केशव पवार यांनी भेट दिली व पाहणी केली नंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन विविध कार्यक्रमात उपस्थित दर्शविली व वृक्षारोपण केले व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे भेट दिली शाळेची पाहणी केली विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधला विद्यार्थ्याला पुस्तक भेट दिले यावेळी, विस्तार अधिकारी मस्के, सरपंच राधाताई टेकाम, उपसरपंच वंदनाताई ताजने, पोपलवार, सचिव राजेश ढगे, माजी सरपंच शेषराव ताजने, ग्रामपंचायत सदस्य मारुती डाहुले, शिक्षक उत्तम शेंडे, अंगणवाडी सेविका, पूजाताई गायकवाड, दुर्गाताई जोगी, ग्रामपंचायत लिपिक सतीश पेंदे, संगणक चालक, हर्षल शेंबडे, रोजगार सेवक, राजेंद्र लांडे, ग्रामपंचायत कर्मचारी, खुशाल खोके, पवन धंदरे, इत्यादी उपस्थित होते
