
प्रतिनिधी//शेख रमजान
महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक 2025 चालू असून उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठी नगरपंचायत असलेली ढाणकी येथे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजला आहे. सर्व राजकीय पक्ष आप आपले उमेदवार जिकूंन नगरपंचायत वर आपली सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय पक्ष मोठ मोठे नेते आता ढाणकीत प्रचार सभा घेत आहे. आज शिवसेना( शिंदे) गटाचे यवतमाळ पालक मंत्री संजय राठोड यांनी विराट प्रचार सभा घेतली असून त्यांनी ढाणकी नगरपंचायत निवडणुकीच वातावरण गरम केले आहे. ढाणकी मध्ये आता शिवसेनेचा बाणच चालेल असे वाटू लागले आहे. प्रचार सभेमध्ये संजय राठोड यांनी पायी रॅली काडून ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेवर पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले.नंतर पूर्ण प्रभागात आपल्या उमेदवार आणि कार्यकर्त्या सोबत पायी रॅली काडून विजय परचम फडकवीला. नंतर आर्यवंश भवन येथे सभा घेऊन त्यांनी मतदारांना संबोधित करताना म्हणाले की,उमेदवाराला आणि सर्व पक्षाला मत मागण्याचा अधिकार आहे तसेच मतदान करणाऱ्या मतदान कोणाला देयायचे याचे हक्क आहे. म्हणून मतदान करताना विचार करून द्या की तुमचा विकास कोण करेल?. मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून वचन देतो की तुम्ही आमच्या पक्षातील उमेदवारांना आशीर्वाद रुपी मतदान करून निवडून आना, मी तुम्हाला तुमच्या गावात होणारी समस्या जशी पावसाळ्यात सुद्धा पाणी पुरवठा -15 दिवसाला होत असून सगळ्यात मोठी पाणी समस्या दूर करण्यासाठी ईशापूर धरण वरून सुद्ध पाणी आणून ढाणकी ची अनेक वर्षपासून असलेली समस्या मार्गी लावेल,तसेच टेमश्वर नगर मधील लोकांचे मालकी हक्क-नियमाकुल करून त्यांना त्त्यांच्या मिळकत पत्रिका तीन महिण्याच्या आत देईल, तसेच गावातील रस्त्याची दुर्वास्ता,नाल्या यासाठी प्रत्येक प्रभागासाठी
एक एक कोटी देईल तसेच एका वर्षात (25) कोटी प्रभागात विकासासाठी देऊन ढाणकी मध्ये अप्पर तहसील करू देईल.
शिवसेना पक्षा मध्ये राजकीय पार्शवभूमी नसणारे कार्यकर्ते असून आम्ही 80% समाज करण 20%राजकारण करतो तेही
20% राजकारण आम्ही या साठी करतो की जनतेची फसवणूक करणाऱ्या राजकारण पक्षाला धडा शिकवावा म्हणून.
आमच्या पक्षात सर्व सामान्य उमेदवार असून आपल्यागावाचा विकासासाठी आम्हांला बळकट करून निवडून द्या. मी यांच्या द्वारे ढाणकी चा विकासाची गंगा वहाणार आहे.मी तुम्हाला
विनंती करतो की,एक दा माझ्यावर विश्वास करून आशीर्वाद द्या मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
ढाणकी नगरपंच्यात मधील अठरा पगड जाती यांनी विचार करून विकासासाठी आमच्या पक्षला सत्ता द्या ढाणकी च्या विकासासाठी कोटी ने निधी उपलब्ध करून ढाणकीचा कायापालट करू. करण राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विकास नगर खाता मंत्री असून यवतमाळ जिल्ह्याचा मी पालक मंत्री असून 1000 कोटी निधी नियोजन करतो. म्हणून मी या ढाणकी शहराचा विकास करणार आहे जर मी नाही केले तर तुम्ही मला राजीनामा पत्र लिहून मांगा मी देईल. कारण मी
जो बोलतो ते करतो.
यवतमाळ पालक मंत्री
संजय राठोड
