जिओ टॉवर मधील डिझेल चोरी करताना एकाला रंगे हात पकडले तर एक पसार

प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर

काल दिनांक 15/05/2021 ला रात्रौ 11 वाजता उमरवाही या गावामधील दोन युवकांनी जिओ टॉवर मधील डिझेल चोरी करताना एकाला रंगे हात पकडण्यात आले व एक जण पळून गेल्याचे समजले. तेव्हा त्या दोन युवकांनी आरडाओरडा केल्यानंतर समस्त गावातील लोक तिथे जमा झाले नंतर त्यांची गावातील लोकांनी कसून चौकशी केल्यावर त्या आरोपी ने आम्ही दोघे मिळून डिझेल चोरी करायला आलो व एक जण पळून गेल्याचे सांगण्यात आले. त्यांची नावे रुपेश पोहन चौधरी व धिरज पांडुरंग चौधरी असे आहेत व हे दोन्ही आरोपी पळसगाव (पिपरडा) येथील आहेत. नंतर गावातील पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशन नवरगाव येथे सांगून त्यांना पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.