‘बुरा मत टाईप करो,बुरा मत लाईक करो,बुरा मत शेअर करो’ यवतमाळ सायबर सेल ची सोशल मीडिया जनजागृती मोहीमेला फुलसावंगी येथे उत्फुर्स प्रतिसाद

फुलसावंगी प्रतिनिधी-संजय जाधव


सोशल मीडिया च्या दुरुपयोगाचे प्रमाण वाढत आहेत.ज्या मुळे जाती-धर्मात तेड निर्माण होत आहे.परिणामी जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.ही बाब टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ पोलीस सायबर सेल ने सोशल मीडिया जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
सोशल मीडिया हे एक साधन आहे जे आजकाल त्याच्या वापरकर्त्यासाठी आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांमुळे खूप लोकप्रिय होत आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि बरेच काही यासारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकांना दूरवर एकमेकांशी जोडण्याची संधी देत आहेत. दुसऱ्या शब्दांत, सोशल मीडियामुळे संपूर्ण जग आपल्या बोटांच्या टोकावर आहे. विशेषतः तरुण वर्ग हा सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करणाऱ्यांपैकी एक आहे. मात्र आता त्याचे अनेक तोटे सुद्धा समोर येत आहे.
असामाजिक तत्व सोशल मीडिया च्या माध्यमातून निराधार व खोटी अफवा पसरवून
जाती – धर्मात तेड निर्माण करण्याचा काम करीत असतात.ही भ्रमक पोस्ट कोणता ही विचार न करता व्हायरल केली जाते.ज्या मुळे दोन घटका मध्ये तणाव निर्माण होऊन अनेक वेळा शांतता भंग होते.शांतता भंग केल्याचे गुन्हे सुध्दा दाखल केले जातात.ज्या मध्ये केवळ 19 ते 30 वयोगटातील तरुणांचा मोठा सहभाग पह्यायला मिळतो. त्यामुळे गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांचे कृतीचा नंतर पश्चाताप होतो. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलली असते. त्यामुळे सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल, अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नये, अगर फॉरवर्ड करू नये, शिवाय ऑनलाईन बँकिंग फ्रॉड चे प्रकरण सुद्धा बळावत आहेत.हे सर्व अनर्थ वेळीच थांबविण्यात याव्यात या साठी जनजागृती ची माफक गरज निर्माण झाली आहे हीच बाब हेरून तरुण मंडळी कडून सोशल मीडिया चा होणारा गैरवापर रोखता यावा या उद्देशाने यवतमाळ सायबर सेल च्या वतीने व्यापक जनजागृती मोहीम राबविली जात असून ही जनजागृती टीमने फुलसावंगी येथे जनजागृती पर कार्यक्रम केले.येथील बिट जमादार निलेश पेंढारकर यांच्या नियोजना मुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद कार्यक्रमास मिळाला.यवतमाळ सायबर सेल चे सतिष सोनुने,अविनाश सहारे, प्रवीण कुंभे,अमोल ठेंगरी यांच्या चमु ने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.