महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपुर तालुका उपाध्यक्ष पदी सचिन बाळसकर यांची निवड

प्रतिनिधी:आशिष नैताम

संस्थापक अध्यक्ष सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होवून संपूर्ण महाराष्ट्रात मनसेच्या भव्य पक्षप्रवेशाचा झंझावत सुरू आहे तरुण युवक, महिला,सामाजिक कार्यकर्ते मनसे मध्ये प्रवेश करीत आहेत अशातच मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री.दिलीप रामेडवार,मनविसे जिल्हाअध्यक्ष श्री.राहुल बालमवार,जिल्हा सचिव मा .किशोरभाऊ मडगुलवार,प्रविन शेवते,क्रिष्णा गुप्ता यांच्या प्रमुख नेतृत्वात दुर्गापूर चंद्रपूरचे श्री. सचिन बाळसकर यांची मनसेच्या चंद्रपूर तालुकाउपाध्यक्ष पदावर नुकतीच निवड करण्यात आली .या निवडीमुळे सचिन बाळसकर यांचेवर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी मनसेचे पदाधिकारी व अनेक मनसैनिक प्रामुख्याने उपस्थीत होते.