चंद्रपूर येथे दिव्यांगाचे शिबीराचे 13 मार्च ला आयोजन.


वरोरा-नारायण सेवा संस्थान जयपूरच्या डॉक्टरांच्या टीमकडून चंद्रपुरात पहिल्यांदाच येऊन दिव्यांगा ची तपासणी, आपरेशन नियुक्ती, आणि दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांगाचे मोजमाप घेण्यासाठी रविवार दिनांक 13 मार्च सकाळी नऊ वाजेपासून शिबिर आयोजित केलेले आहे. हे आयोजन पंजाबी सेवा समिती कबीर नगर यांनी आयोजित केली आहे. शिबिरात जन्मजात दिव्यांगाचे निशुल्क तपासणी करण्यात येणार आहे. आपरेशन साठी झालेल्या दिव्यांग व्यक्तीला निश्चित तारखेला उदयपूर ला बोलावून निशुल्क शत्रक्रिया केल्या जाईल. ज्या दिव्यांग यांनी अपघातात आपले हात पाय गमावले असेल अशा दिव्यांग व्यक्तीला कुत्रिम अंग उपलब्ध करण्यासाठी मोजमाप करण्यात येणार असून दिलेल्या तारखेला पुन्हा बोलावून कृत्रिम अंग लावल्या जातील.शिबिरात येतेवेळी दिव्यांग व्यक्ती ने आपले आधार कार्ड झेरॉक्स कॉपी व अपंगत्व दिसेल असे दोन फोटो सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे.
पंजाबी सेवा समिती चंद्रपूर द्वारा आयोजित मोड्युलर कुत्रिम हात पाय मोजमाप शिबिरात जास्तीत जास्त जरूरत मंदानी उपस्थित राहण्याची अपील अध्यक्ष अजय कपूर, उपाध्यक्ष सुरेश शर्मा, विक्रम शर्मा, भगवान नंद वाणी, किशन कुमार चड्डा, कुक्कु साहनी यांनी केली आहे.