स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीसाठी म.न.से.ची वे.को.ली जी.एम कार्यालयावर धडक म.न.से शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर

वे.को.ली.भटाळी येथील जि.आर.एन कंपनीत स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार देण्यात यावे या प्रमुख

विविध मागण्यांसाठी मनसेचे शहर अध्यक्ष मनदिप रोडे, यांच्या नेतृत्वात वे.को.ली चंद्रपूर चे मुख्य मॅनेजर यांच्या कार्यालयात धडक देत वेकोली जि.एम. ला जाब विचारण्यात आला यावेळी जी.एम सोबत कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत म.न.से नेत्यांची बाचाबाची झाली. यामुळे संतप्त मनसे नेत्यांनी स्थानिक भूमीपुत्रांना न्याय वेकोली जी.एम सह जी.आर.एन कंपनी मॅनेजर ला बाहेर फिरू देणार नाही असा सज्जड दम दिला.

वे.को.ली भटाळी कोळसा खाणीत जी.आर.एन कंपनीत स्थानिक भूमीपुत्रांना कामावर न ठेवता आंध्रप्रदेश,तेलंगणा,उत्तरप्रदेश अशा परप्रांतीय कामगारांना कामावर ठेवल्या जात आहे. यामुळे स्थानिक कामगारांना रोजगार देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

जी.आर.एन. कंपनी व्दारे कामगारांना बोनस दिल्या जात नाही त्यांना बोनस देण्यात यावा कामगारांचा हेल्थ इन्शुरन्स काढण्यात यावा, कॅम्पच्या ठिकाणी अॅम्बुलन्स सेवा सुरु करण्यात यावी. सकाळी शिफ्ट ची वेळेत बदल करण्यात यावी. कंपनीचे नादुरुस्त वाहन दुरुस्त करावे आदी विविध मागण्या पुर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली. या मागण्या पुर्ण न झाल्यास येत्या काळात वेकोली जी.एम, जी. आर. एन. कंपनीचा जी. एम. ला बाहेर फिरू न देण्याचा ईशारा दिला. या वेळी उपस्थित म न.से. नेते मनदिप रोडे मनसे महिला जिल्हाध्यक्ष सुनिताताई गायकवाड,शहर सचिव सुमीत करपे, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, आकाश भालेराव जिल्हाध्यक्ष जनहित कक्ष, मनसे महिला सेना शाखा अध्यक्ष संगीताताई धात्रक, विभाग अध्यक्ष स्वाभी राऊत,शहर उपाध्यक्ष बाळा चंदनवार, संदिप अरडे, राहूल मडावी, कृष्णा गुप्ता, मिथुन महाकुलकर, रोषन बदकी, तुषार रागीट, मुकेश बावणे, आशिष शेंडे, अनिल कपाटे, संजय फरडे, आदि मनसैनिक उपस्थीत होते.