राजुरा गावातील स्थानिकांना आपल्या कंपनीमध्ये रोजगार द्या,मनसेचे जी.आर.एन.कंपणी यांना निवेदन

प्रतिनिधी:आशिष नैताम

कोळसा खदान जी. आर. एन. कंपनी प्रायव्हेट आहे तिथे आपल्या मॅनेजर व सुपरवायझर यांनी बाहेरून कामगार बोलवले असून स्थानिक कामगारांना डावलले जात आहे त्यामुळे राजुरा तालुक्यातील स्थानिकांना आपल्या कंपनीमध्ये रोजगार देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाच्या नियमानुसार 80 टक्के रोजगार स्थानिकांना द्यावा लागतो तरी पण शासनाच्या नियमाला न जुमानता कंपनी स्थानिकांना प्राधान्य देत नाहीत आपल्या महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहेत आपल्या कंपनीमध्ये स्थानिक मजुरांना कामावर घेऊन स्थानिक कामगारावर होणारा अन्याय थांबविण्यात यावा स्थानिक कामगारांच्या उदरनिर्वाह सुरळीतपणे चालेल तसेच गावात कंपनी असल्याने येथील स्थानिक कामगारांना जास्त अधिकार आहे सध्यास्थितीत कोरोणा महामारी मुळे सर्वत्र कामाचा तुटवडा असून अनेक स्थानिक नागरिक रोजगाराविना आहे त्याची योग्य स्तरावर चौकशी करून येथील कामगारांना न्याय मिळवून द्यावा स्थानिकांना रोजगार मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदन देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बालमवार, मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र,राजूरा विधानसभा अध्यक्ष महालींग कंठाळे,मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेळे,चंद्रपूर तालूका अध्यक्ष विवेक धोटे,राजूरा तालूका अध्यक्ष राजू गड्डम,बल्लारपूर तालूका अध्यक्ष कल्पना पोर्तलावार,कोरपना तालूका अध्यक्ष सुरेश कामडे,प्रविण शेवते,बल्लारपूर शहरअध्यक्ष प्रविण दासारपू,क्रिष्णा पोतर्लावार आदी मनसैनीक उपस्थीत होते