
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
चंद्रपुर : अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील विशेष पथकांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
पथकाद्वारे दि. 03 डिसेंबर रोजी वसीम अख्तर झिमरी यांचे गोडाऊन प्लॉट नं. E-69, दाताळा एमआयडीसी, चंद्रपूर यांचेकडून एकूण 8 लाख 25 हजार 800 किंमतीचा साठा ताब्यात घेतलेला आहे.
यासोबतच 1 एप्रिल 2020 ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत एकुण 36 पेढयांवर कारवाई घेवून 58 लाख 48 हजार 388 रूपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
विशेष पथकाचे पथक प्रमुख
नि.दि.मोहिते नागपुर विभाग. चंद्रपूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अ. या. सोनटक्के, जी. टी. सातकर व प्र.अ उमप यांनी सदर घटनेचा तपास केला आहे. पोलीस स्टेशन, पडोली येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
