



शहर प्रतिनिधी:राहुल झाडे,वरोरा
चंद्रपूर नागपूर हायवे लागत असलेल्या टाकळी नंदोरी गावालगत असलेल्या जिनिंग जवळ काल रात्री 11 च्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले आहेत.MH34 BK 2621 या दुचाकीने वरोरा शहरातील खांजी वॉर्ड येथील रहिवासी निलेश गणवीर वय 30 व आदित्य आडे वय 28 चंद्रपूर ला जात असता टाकळी गावानजीक चंद्रपूर मार्गाने जाणाऱ्या ट्रक MH 34 CQ 6262 या ट्रक ला मागून धडक दिल्याने दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे .या दोन्ही युवकांचा शवविच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आणण्यात आला होता.त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केला जाणार.पोलीस पुढील कारवाई करीत आहे.
