सब सेट है?वरोरा तालुक्यात चक्क जेसीबीने अवैधरित्या रेती उत्खनन

सहसंपादक:प्रशांत विजय बदकी


वरोरा तालुक्यात बेधडकपणे जेसीबी मशीन च्या मदतीने नदीपात्रातुन अवैधरित्या रेती उत्खनन जोरात सुरू आहे.तालुक्यातील नदीपात्रातून ,वनविभागाच्या हद्दीतील नाल्यातून रात्रीचा अंधाराचा फायदा घेत अवैध उत्खनन सुरू आहे.या मध्ये वनविभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी डोळे मिटून दूध पीत असल्याची चर्चा आहे .अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय अवैध उत्खन अशक्य आहे .यामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

वरोरा तालुक्यातील बेधडक चालणाऱ्या रेतीतस्करी मुळे सब सेट है च्या चर्चा चौकाचौकात सुरू आहे.


मागील दोन वर्षांपासून तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव नसल्याने सामान्य नागरिकांचे घर बांधकाम तसेच शासकीय बांधकामात चोरीची रेती वापरत लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडविण्याचा प्रकार सुरू आहे.आवास योजनेतील लाभार्थ्यांना याचा विशेष फटका बसत आहे.शासनाकडून घर बांधकामकरिता 2.5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होतो परंतु त्या पैश्या मध्ये वाढीव दराने रेती खरेदी करावी लागत असल्यानें भुर्दंड सहन करावा लागत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वारंवार मागनी होत आहे की घरकुल लाभार्थ्यांना शासकीय दरात जप्त केलेली रेती उपलब्ध करून घ्या जेणेकरून त्यातून शासनाला महसूल मिळेल आणि घरकुल लाभार्थ्यांना कमी दरात रेती उपलब्ध होईल परंतु या मागणीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.वरोरा तालुक्यात 6000 ते 7000 या दराने रेती तस्कर रेती विकत आहे.रात्रीच्या अंधारात व पहाटे च्या सुमारास ही तस्करी होते.याला रात्रीस खेळ चाले असे म्हणता येईल.