
वरोरा:–शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता व केंद्र सरकारने बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रोहीत पवार विचार मंचच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
आज देशातील लाखो शेतकरी बांधव हे देशाची राजधानी दिल्ली येथे नुकत्याच पारीत झालेल्या कृषी विधायक विरोधात आंदोलन करण्यासाठी एकत्र आले आहे.
परंतु केंद्रातील सरकारने त्यांना राजधानी दिल्ली च्या सिमेवरच अडकवून त्यांच्यावर लाढीचार्ज , अश्रुधूर, पाण्याचे फवारे इ. चा मारा करून त्यांचे आंदोलन बळाचा वापर करून दडपण्याचा चालविला या सर्व निंदनीय प्रकाराचा आम्ही या निवेदनाद्वरे निषेध व्यक्त करतो. आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठींबा आहे हे जाहीर करत आहो.
केंद्रातील सरकारने अन्यदात्या शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना न पटणारे काळे कायदे त्वरित मागे घ्यावे . लवकरात लवकर शेतकऱ्यांचे हे आंदोलन मिटवावे हि मागणी या निवेदनाद्वारे करीत आहो. जर हे शेतकऱ्यांचे आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न केला तर वरोरा येथे आंदोलन करू असा इशारा अभिजित कुडे यानी दिला
आज दि.७ डिसेंबर २०२० रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तालुका व रोहीत पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा तर्फे अभिजित कुडे यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला तसेच सरकारने बाळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा जो प्रकार केला त्याचा निषेध नोंदविण्यात आला. या संबंधीचे निवेदन मा. तहसीलदार साहेब यांना देण्यात आले.
याप्रसंगी अभिजीत कुडे, रोहीत पवार विचार मंच तालुका अध्यक्ष गणपत भडगरे , रोशन भोयर, पंकज मांडवकर , ऋषिकेश कुडे , योगेश पुसदेकर, रंजीत कुडे, विनोद कोठारे, ऋषिकेश पाटील, विजय कुडे , कुणाल गौलकर , संकेत आत्राम व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
