
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
लोकहीत महाराष्ट्र चंद्रपूर ग्रुप ला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
https://chat.whatsapp.com/G89E43ibblxErzEKGguOcb
चंद्रपूर : चंद्रपूर परिसरातील आमदार किशोर जोरगेवार यांनी काल 11 डिसेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी केली व तेथील सुविधांचा आढावा घेतला. या वेळी गेल्या 1 महिन्यापासून डायलिसिस मशीन बंद पडल्याचा शोध लागल्यानंतर दोन दिवसांत मशीन सुरू करण्याच्या सूचना आमदार जोररगेवार यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.
जिल्ह्यासह तसेच जिल्ह्याबाहेरील रुग्ण चंद्रपूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात. परंतु रुग्णालयात किडनी आजाराच्या रोगामुळे गेल्या 1 महिन्यापासून डायलिसीस मशीन बंद पडल्यामुळे लोकांना खासगी रुग्णालयातून तपासणी करावी लागत आहे. ज्यामुळे गरीब रूग्णांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
रुग्णालयात मशीन बंद पडल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सरकारी रुग्णालयाचा आढावा घेतला. तपासणी दरम्यान मशीन बंद असल्याचे दिसून आले असता विद्यमान रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून जबाब मागीतला आणि दोन दिवसांत मशीन सुरू करण्यास सांगितले.
आजारी रूग्णांना खासगी रुग्णालयात पाठवण्याऐवजी त्यांना क्राइस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार देण्याची सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली.
यावेळी सीएस निवृत्ती राठोड, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे उपविभागीय अभियंता राजेश चव्हाण, सहाय्यक अभियंता विवेक अंबुले, यंग चंदा ब्रिगेडचे विलास सोमलवार, हरमन जोसेफ आदी उपस्थित होते.
