
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
चंद्रपूर – चंद्रपूरच्या याेग पतंजली समिती महिला जिल्हा प्रभारी तथा चंद्रपूर निवासी सुधाताई साधनकर यांची आज सकाळी दीर्घ आजाराने प्राणज्याेत मालवली. गेल्या काही दिवसापासुन चंद्रपूर येथील एका स्थानिक खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु हाेते. त्या अत्यंत मनमिळावू व शांत स्वभावाच्या असल्यामुळे त्यांनी याेग पतंजलीच्या अनेक कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकला हाेता. त्यांच्या निधनाची बातमी कानावर येताच आज अनेकांनी शाेकसंवेदना व्यक्त करीत आपली भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली. दरम्यान सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मेघा धाेटे, मायाताई काेसरे, सराेज हिवरे, अरुणा गावुत्रे, अल्का सदावर्ते, संजीवनी धांडे, अल्का गंगशेट्टीवार, भावना भाेयर, अर्चना पिदुरकर यांनी सुधाताई यांच्या निधनाबाबत शाेक संदेशातुन दुःख व्यक्त केले आहे.
