वर्धा जिल्ह्याची लस साठवणूक क्षमता तब्बल पाच हजार लीटर

प्रतिनिधि : वृषभ पोफळी

वर्धा : कोविडची लस अंतिम टप्प्यात असून ती जिल्ह्यातील १७ हजार व्यक्तींना प्राधान्य क्रमाने दिली जाणार आहे . वर्धा जिल्ह्याची एकूण लस साठवणूक क्षमता पाच हजार लीटरची असून ६३ आयएलआर तर ६१ डिप फ्रिजर त्यासाठी उपलब्ध आहेत . शिवाय ईव्हीआयएन अप्पद्वारे शीतगृहवर लक्ष ठेवले जाते . कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर राज्यात कोविड -१ ९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे . सुमारे १७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार असून आरोग्य विभागाने पूर्व तयारी करावी अशा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत . जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन आरोग्य विभागानेही आपली तयारी सुरू केली आहे . आरोग्य विभाग वेळोवेळी बीसीजी , पोलिओ , रुबेला आदी
लसीकरण मोहीम राबवितो . त्यामुळे कोविडमुक्तीसाठीचे लसीकरण हे आरोग्य विभागासाठी नवीन नसणार आहे . पण विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले .