आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर

लोकहीत महाराष्ट्र चंद्रपूर ला जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/G89E43ibblxErzEKGguOcb

चंद्रपूर : आज 17 डिसेंबर आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन येथील कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यंग चांदा ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. वाढदिवसानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन जवळील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून यात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यांच्या ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.