
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
चंद्रपूर : राकाँ प्रदेशाध्यक्ष महेबूब खान यांच्याविरोधात भाजप तर्फे काल जोरदार निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेबूब खान यांनी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भाजप चंद्रपूर महानगर आणि भाजयुमो तथा महिला आघाडीच्या वतीने चंद्रपुरात निषेध आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकारी सत्तेचा फायदा घेऊन अशा घटना घडवत आहेत. हे लाजिरवाणे आहे. दोषी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कठोर कारवाई करावी तसेच फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणी अंजली घोटेकर यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनानंतर भाजप अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना अतिरिक्त विनंत्या पाठविण्यात आल्या आहे.
