
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापुर
निरपेक्षतेने समाजप्रबोधन, समाजकल्याणासाठी झटले, माणसात देव शोधणारे, आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे
ज्येष्ठ समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या
स्मृतीदिनी पांढरकवडा बसस्थानक येथे पुण्यतिथी निमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वेळी अध्यक्ष स्थान विजय गोडे व प्रमुख पाहुणे वासुदेव शेंद्रे, बंडू भाऊ सोयाम, सूरज गेडाम, मनोज भोयर, बिशनसिंग शिंदो, राहुल जोगदंडे, विलास वाघमारे, मनोज देशमुख, सुमित चाटाळे आदी उपस्थित होते.
यावेळी पांढरकवडा शहरात स्वच्छता करणारे सत्कारमुर्ती भाऊराव नागो गेडाम यांचा सत्कार करण्यात आला, सूत्रसंचालन धीरज एंचलवार यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन संत गाडगेबाबा उत्सव समिती व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, पांढरकवडा तर्फे करण्यात आले,
तसेच राजू वरगंटवार, अरुण केळझरकर, विनोद एंचलवार, महेश अक्केवार, डोंगरे सर, शुभम वरगंटवार, बादल ऊइके, अनिकेत मिसाळ, संतोष पेंढारवार, आदींनी आयोजन केले. व कार्यक्रमाला समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.
