
वरो-यातील स्मशानभूमी व कब्रस्तानातील स्वच्छता अभियानाच्या दुस-या टप्यात मालविय वार्ड वरोरा व मोहम्मदिया कब्रस्थानात स्वच्छता अभियान राबवून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश !!!!!!!
सदभावना एकता मंच व सदभावना युवा एकता च्या संयुक्त विद्यमाने दि. १९ डिसेंबर २०२१ पासून कब्रस्तान व स्मशानभूमी स्वच्छता अभियानाला सुरवात करण्यात आली . रविवारी व सरकारी सुटीचे दिवशी सकाळी ८-०० ते १२-०० पर्यंत स्वच्छता अभियान वरो-यातील सर्वच कब्रस्तान व स्मशानभूमितील वाढलेला कचरा साफ होईपर्यंत सुरु रहाणार आहे . दि. १९ डिसेंबरला या अभियानाची सुरवात वणी नाका स्मशान भूमितून करण्यात आली . आज मालविय वार्ड स्मशानभूमीतून अभियानाची सुरवात करण्यात आली . यावेळी सदभावना युवा एकताची संपूर्ण टीम व मालविय वार्डातील 24 तास सेवा ग्रुप चे लखन केशवानी आपल्या टीम सोबत उपस्थित राहून या स्वच्छता अभियानात सहभागी होते . मालविय वार्ड वरोराचे नगरसेवक सनी गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते . वाढलेला कचरा झाडं झुडपं मशिनद्वारे कटींग करुन त्याचे ढीग लावून कचरा जाळण्यात आला .सदभावना एकता चे छोटूभाई शेख , प्रविण खिरटकर, गोपाळ गुडधे , अरुण उमरे , सचिन मेश्राम , ओम चावरे , धनराज आसेकर , पंकज बन्सोड , सचिन राऊत यांनी संपूर्ण अभियानाचे नियोजन केले . या अभियानाच्या माध्यमातून सदभावनाच्या संपूर्ण टीमने आपसी भाईचारा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला . सदभावना युवा एकताचे गिरीष ढवस , प्रजय धोटे , राज गुडधे , आकाश नक्षिने , शुभम् वानखेडे , सुरज राऊत , विनोद काळसर्पे ,रुषी बोबडे , विनित बोबडे , प्रणय परचाके , लोकेश बोबडे , गणेश चिंचोलकर , सागर चिंचोलकर , अनिरुद्ध ठावरी , आयुष मडावी व उत्कर्ष मत्ते , प्रविण पिंपळकर पूर्णवेळ उपस्थित राहून अभियानात सहभागी होते .
