टायगर ग्रुप ने चिंचाळा गावातील युवकांशी केली हितगुज.

प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर

सरकारी यंत्रणेच्या नियम व अटींचे पालन करून जिल्ह्या-जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.

विशेषतः युवकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, त्यांना भासलेल्या मदतीला धावून जाण्यासाठी, युवकांना कार्यक्षेत्रात पाठिंबा देण्यासाठी टायगर ग्रुप हा नेहमीच सज्ज असतो.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिंचाळा या गावात टायगर ग्रुप ने काल शनिवार 19 डिसेंबर रोजी भेट दिली.

टायगर ग्रुपचे सदस्य सूर्या भाऊ अडबाले यांनी चिंचाळातील युवकांशी संवाद साधला तसेच टायगर ग्रुप समिती गठन करू अशी इच्छा देखील दर्शविली.
याप्रसंगी योगेश पुनवटकर समेत विद्यार्थी, युवा व ग्रामस्थ उपस्थित होते.